फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'सुख म्हणजे नक्की..' मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 18:48 IST2022-07-31T18:47:43+5:302022-07-31T18:48:27+5:30
Madhavi nimkar: सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कॉलेजजीवनातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसून येत आहे.

फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'सुख म्हणजे नक्की..' मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार मंडळी कायम नवनवीन मार्ग अवलंबत असतात. यात सध्या सोशल मीडिया हे चांगलं प्रभावी माध्यम झालं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्या मदतीने कलाकार सहज चाहत्यांसोबत जोडले जातात. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या करिअरसोबत पर्सनल लाइफविषयीचे अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कॉलेजजीवनातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोत दिसणारी तरुणी एक लोकप्रिय असण्यावर कोणाचाही विश्वास नाही. विशेष म्हणजे सध्या ही अभिनेत्री सुख म्हणजे नक्की काय असतं या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून माधवी निमकर (madhavi nimkar) आहे. माधवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या माधवी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी वहिनी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.