"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:56 IST2023-11-21T18:55:45+5:302023-11-21T18:56:45+5:30
शालिनी आणि मल्हार ही मालिकेतील लोकप्रिय जोडी होती.

"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं(Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेचं कथानक २५ वर्षांचा लिप घेत आहे. मालिकेत जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. त्यामुळे काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे तर काही पात्रांची एक्झिट. मालिकेत शालिनी या पात्राचाही प्रवास थांबत आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nemkar) पोस्ट शेअर केली आहे.
शालिनी आणि मल्हार ही मालिकेतील लोकप्रिय जोडी होती. माधवी निमकरने मल्हारसोबतचे फोटो शेअर करत लिहिले,'सोबत काम करण्याचा हा प्रवास अप्रतिम होता. ३ वर्ष कधी संपली कळलंच नाही. शालिनी मल्हार म्हणून आपल्या किती सुंदर आठवणी आहेत. मजा, मस्ती, गप्पा खूप खूप आठवणी आहेत.'
ती पुढे लिहिते,'शालिनी मल्हारचा प्रवास थांबला. पण नक्कीच लवकरच परत एकत्र काम करु. शालिनी मल्हार जोडीला खरंच भरभरुन प्रेम मिळालं. ही पोस्ट विशेषत: आमच्या फॅन पेजेससाठी आहे. ज्यांनी आमचे रील्स, फोटो पोस्ट करुन त्यांचं आणि त्यांना फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहचवलं. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. तुमच्या उदंड प्रतिसादासाठी आभार.'
चाहत्यांनी माधवीच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. 'आम्हाला पार्ट २ मध्येही शालिनी पाहिजे नाहीतर सिरीयल बघायला मजा नाही','आमची आवडती खलनायिकाच नाही वाईट वाटत आहे' अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी मन मोकळं केलं आहे.