"दोघेही घाबरत होतो, कारण...", कोमल कुंभारने केलंय रजिस्टर लग्न; कारणही सांगितलं, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:24 IST2026-01-15T18:20:57+5:302026-01-15T18:24:26+5:30
"आम्ही रजिस्टर लग्न केलं होतं, कारण...",'सहकुटुंब सहपरिवार' फेम कोमल कुंभारच्या लग्नाची माहित नसलेली गोष्ट

"दोघेही घाबरत होतो, कारण...", कोमल कुंभारने केलंय रजिस्टर लग्न; कारणही सांगितलं, म्हणाली...
Komal Kumbhar And Gokul Dashwant: अलिकडेच्या महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री कोमल कुंभार. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी (अंजी) म्हणजेच कोमलने तिचा प्रियकर गोकुळ दशवंतसोबत २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नुकतीच या जोडीने मकर संक्रांतीच औचित्य साधून मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांची प्रेमकहाणी तसेच लग्नाबद्दल अनेक खुलासे केले.
अभिनेत्री कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत गेली काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी गोकुळने अभिनेत्रीला खास सरप्राईज देत प्रपोज केलं होतं.त्यांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. गोकुळ आणि कोमलची पहिली भेट ही रंगभूमीवर झाली होती. त्याचदरम्यान, त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नुकतीच या जोडप्याने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, गोकुळ दशवंत म्हणाला,"एकदा मी राज्य नाट्य मंडळाचं नाटक बसवत होतो. त्यावेळीच माझे वडील गेले. त्यावेळेस हिने मला मोठा धीर दिला होता. आपल्याकडे एकतर अशा परिस्थितीत एक वर्षाच्या आत लग्न करा किंवा ते तीन वर्षानंतर केलं जातं. त्यानंतर माझ्या लग्नाबद्दल घरी लग्नाचा विषय निघाला." कास्टमुळे हे नातं स्वीकार केलं गेला नसतं. असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
त्यानंतर पुढे गोकुळ म्हणाला,"मग मी हिला सगळं सांगितलं आमच्या घरी असं काहीतरी चालू आहे. एक मुलगी बघितल्यानंतर मी हिला सांगितलं होतं. मी कोमलला म्हणालो, तुला जर नसेल करायचं लग्न तर सांग.कारण मला घरून प्रेशर आहे. तुला नसेल करायचं तर मी पुढचा निर्णय घेतो. त्यावर ही म्हणाली- 'तू जा... मुलगी बघून ये... कांदे पोहे खा आणि नकार दे. ' मला काहीच कळेना.तेव्हा तीन मुली बघून झाल्या होत्या, आणि त्या तिघींचाही होकार होता. या सगळ्यानंतर ही मला म्हणाली,'थोडं थांब आपण घरी सांगून बघू काय होतंय.'त्यानंतर हिच्या घरी बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यामुळे लग्न शक्यच नव्हतं. तेव्हा कोमल म्हणाली, "आमच्या नात्याच्या स्वीकार केलाच नसता. कारण, आमच्याकडे कास्टचा प्रॉब्लेम आहे."
आम्ही रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला, कारण...
मग अभिनेत्रीचा नवरा म्हणाला, "त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. हे सगळं करत करत २०१८ निघालं. मग मी म्हणालो, तू तुझ्या घरी सांगू नको. मी तुझ्या घरी सांगणार नाही. आम्ही नाटकामुळे एकत्र आलो त्यामुळे ५ नोव्हेंबर २०१८ ला आम्ही रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सगळी तयारी करूनही ही त्या दिवशी आलीच नाही. नंतर मग फायनली ५ नोव्हेंबर २०१९ ला आम्ही रजिस्टर लग्न केलं. या सगळ्या प्रवासात माझा भाऊ माझ्यासोबत होता. तेव्हा आम्ही लग्न केलं म्हणून बरं झालं नाहीतर आम्ही एकत्र नसतो."