पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."

By कोमल खांबे | Updated: June 12, 2025 13:34 IST2025-06-12T13:34:13+5:302025-06-12T13:34:46+5:30

पन्नाशी ओलांडलेल्या कविता आजही तितक्याच फिट आहेत. त्यांच्या या फिटनेसमागचं सिक्रेट समोर आलं आहे. 

marathi actress kavita laad medhekar shared her fitness secret revealed how she loss weight aftre delivery | पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."

पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."

मराठीतील लोकप्रिय आणि ९०चा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कविता मेढेकर. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अजूनही त्या नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण, अभिनयाबरोबरच त्यांनी त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष दिल्याचं दिसतं. पन्नाशी ओलांडलेल्या कविता आजही तितक्याच फिट आहेत. त्यांच्या या फिटनेसमागचं सिक्रेट समोर आलं आहे. 

कविता लाड मेढेकर यांनी नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. त्या म्हणाल्या, "मला खूप जण विचारतात की तुम्ही लग्नानंतर, दोन मुलं झाल्यानंतरही इतक्या फिट कशा राहिलात? मी त्यांना सांगू इच्छिते की मला घरातून खूप सपोर्ट होता. दोन मुलं झाली पण याचं मला कधीच दडपण नव्हतं. माझे सासू सासरे मुलांना सांभाळत होते. तुला जीमला जायचंय, एक तास व्यायाम करायचाय, तुला तुझा वेळ मिळाला पाहिजे. तू एक अभिनेत्री आहेस, असं ते म्हणायचे". 

"मी एक वर्ष छान वजन वगैरे वाढवलं होतं..म्हणजे ते वाढतंच. पण, मी ते एन्जॉय केलं. मला असं कधीच वाटलं नाही की माझं वजन वाढलंय. ठीक आहे वाढलं तर वाढलं. ती एक फेज असते आणि ती मी मनापासून एन्जॉय केली. पण, सासऱ्यांनी सांगितलं होतं की वर्षभरात तुझं वजन कमी झालं पाहिजे. आणि तेही मी तितक्याच मेहनतीने केलं. मूल वर्षाचं झाल्यानंतर मी माझं वजन हळूहळू कमी केलं. त्यामुळे सपोर्ट नुसता म्हणण्यापुरता नसतो. तो जेव्हा खरंच मिळतो तेव्हा एक छान व्यक्तिमत्त्व तयार होतं", असंही त्या पुढे म्हणाल्या. 


कविता लाड यांनी 'राधा प्रेम रंगी रंगली', 'उंच माझा झोका', 'राधा ही बावरी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'चार दिवस सासूचे' ही तिची मालिका प्रचंड गाजली. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील त्यांनी साकारलेली भुवनेश्वरी ही भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली. त्यांचं 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 

Web Title: marathi actress kavita laad medhekar shared her fitness secret revealed how she loss weight aftre delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.