वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:01 IST2025-06-24T16:59:00+5:302025-06-24T17:01:31+5:30

कौतुक करावं तितकं कमीच! वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं 

marathi actress kashmira kulkarni helps to varkari pandharpur wari video viral | वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक

वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक

Kashmira Kulkarni Ashadhi Wari : आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांसाठी विठुरायाच्या भक्तीचे एक माध्यम असते. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममाण होण्याचा मानस अनेकांचा असतो. या वारीमध्ये अनेक विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यातच सोशल मीडियावर मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा आहे.


दरम्यान, या वारीमध्ये सर्वसामान्यांसह कलाकार मंडळीही सहभागी होतात. त्यातच सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही मराठी अभिनेत्री गेली अनेक वर्षे करते वारकऱ्यांची सेवा करते आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी. कश्मिरा ही देखील 'शुचिकृत्य फाउंडेशन' मार्फत वारकऱ्यांची सेवा करते. या कामासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. 

सायली संजीव, आदेश बांदेकर तसेच जुई गडकरी आणि अमित भानुशाली आणि शर्वरी जोग या कलाकारानंतर आता कश्मिराही वारीत वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाची मालिश करताना दिसते आहे. तर कधी खाऊवाटप करताना  पाहायला मिळाला. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊसच पाडला आहे. 

Web Title: marathi actress kashmira kulkarni helps to varkari pandharpur wari video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.