'दिवाळी पहाट'च्या भर कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीने गायली शिवस्तुती, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:30 IST2025-10-20T15:29:46+5:302025-10-20T15:30:03+5:30
दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातील कलाकारांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होतात. एका मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिवाळी पहाटच्या भर कार्यक्रमात अभिनेत्री शिवस्तुती म्हणताना दिसत आहे.

'दिवाळी पहाट'च्या भर कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीने गायली शिवस्तुती, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना कलाकारही हजेरी लावत त्यांच्या चाहत्यांना सरप्राइज देत असतात. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातील कलाकारांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होतात. एका मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिवाळी पहाटच्या भर कार्यक्रमात अभिनेत्री शिवस्तुती म्हणताना दिसत आहे.
डोबिंवलीमधील एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात झी मराठीच्या काही कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सगळ्यांसमोरच अभिनेत्रीने मोठ्याने गर्जना करत शिवस्तुती म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. या दिवाळी पहाटमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे कमळी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी विजया बाबर आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहते विजायावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, विजया सध्या 'कमळी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तिचा मालिकेतील शिवसुस्ती म्हणतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. याआधी विजया 'जय जय श्री स्वामी समर्थ' मालिकेत दिसली होती. 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकेतही ती मुख्य भूमिकेत होती.