जुई गडकरीचा कौतुकास्पद निर्णय, मुक्या जनावरांसाठी सुरू करणार NGO
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:45 IST2024-10-30T14:44:36+5:302024-10-30T14:45:21+5:30
जुई आज मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.

जुई गडकरीचा कौतुकास्पद निर्णय, मुक्या जनावरांसाठी सुरू करणार NGO
आपल्या सहज सुंदर अभिनयाने जुई गडकरी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' तसेच 'वर्तूळ' अशा मालिकांमध्ये जुई मुख्य भूमिकेत झळकली. गेल्या दीड वर्षांपासून 'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शिवाय टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे. सोज्वळ, सालस असलेली जुई आज मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. जुईचं मुक्या प्राण्यावर प्रचंड प्रेम अहे.
जुईने आता प्राण्यासाठी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ती लवकरच मुक्या जनावरांसाठी NGO सुरू करणार आहे. इट्स मज्जाशी बोलताना जुई म्हणाली, "मुक्या जनावरांसाठी शेल्टर सुरू करण्याची माझी गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे. अशा भाकड झालेल्या गायी, ज्यांचा काही उपयोग नाही, ज्यांना सोडून दिलं जातं. मग ट्रॅकवर येतात. असे खूप म्हतारे जनावरे असतात, ज्यांचं म्हातरपण खूप कठीण आहे. आपल्या वाटतं की माणसांचं म्हातारपण कठीण आहे. पण, तसे नाही. त्यांचं दुप्पट कठीण आहे. त्यामुळे अशा जनावरांसाठी शेल्टर सुरू करायचं आहे", अशी इच्छा तिने व्यक्त केली.
एवढंच नाही तर जुई गेल्या काही वर्षांपासून शांतीवन आश्रमातील निराधार आजीआजोबा आणि कुष्ठरोगाने त्रस्त असणारे काही पेशंट यांच्यासोबत दिवाळी साजरे करते. यंदाही जुई आश्रमात पोहचली होती. समाजातील अनेक घटक असे आहेत. ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. त्यांच्या आयुष्यातही सुखाचा प्रकाश यावा, म्हणून जुईचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. जुईच्या या स्तुत्य उपक्रमाचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.