मुसळधार पावसाचा जुईला फटका! ट्राफिकमध्ये अडकून पडली अभिनेत्री, संतापून म्हणाली- "अर्धा तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:04 IST2025-06-16T12:04:08+5:302025-06-16T12:04:44+5:30

कालपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका जुईलाही बसला आहे.

marathi actress jui gadkari stuck in traffic deu to heavy rain shared video and angry reaction | मुसळधार पावसाचा जुईला फटका! ट्राफिकमध्ये अडकून पडली अभिनेत्री, संतापून म्हणाली- "अर्धा तास..."

मुसळधार पावसाचा जुईला फटका! ट्राफिकमध्ये अडकून पडली अभिनेत्री, संतापून म्हणाली- "अर्धा तास..."

मुंबईचं ट्राफिकचा सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा याबाबत कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होतात. ट्राफिकमुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अभिनेत्री जुई गडकरीलाही मुंबईतील या ट्राफिकचा फटका बसला आहे. अभिनेत्रीने संतापून व्हिडिओ शेअर करत परिस्थिती दाखवली आहे. 

जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ट्राफिकचा व्हिडिओ शेअर केला आहे. कालपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका जुईलाही बसला आहे. दहिसर टोल नाक्यावर ट्राफिकमुळे जुईची गाडी एकाच जागी अर्धा तास उभी होती. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "अर्ध्या तासापासून दहिसर टोलनाक्यावर अडकली आहे", असं म्हणत जुईने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. 

दरम्यान, जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 

Web Title: marathi actress jui gadkari stuck in traffic deu to heavy rain shared video and angry reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.