अभिनयाव्यतिरिक्त जुई करते स्पेशल ड्युटी; शेअर केला क्यूट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:39 IST2024-01-07T15:38:03+5:302024-01-07T15:39:31+5:30

Jui gadkari: जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actress Jui does special duty Shared a cute video | अभिनयाव्यतिरिक्त जुई करते स्पेशल ड्युटी; शेअर केला क्यूट व्हिडीओ

अभिनयाव्यतिरिक्त जुई करते स्पेशल ड्युटी; शेअर केला क्यूट व्हिडीओ

'पुढचं पाऊल' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. कर्जतची लेक असलेली जुई सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते. तिच्याविषयीच्या गोष्टी शेअर करते. यामध्येच तिने अभिनयाव्यतिरिक्त तिला आणखी एक ड्युटी करावी लागत असल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जुईने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने घरी असल्यावर तिला कोणती ड्युटी करावी लागते हे सांगितलं आहे. मात्र, तिचं हे काम पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुकच केलं आहे.

"मावशी ड्युटी! दत्तजयंतीला घरी भजन सुरु असताना आमच्या प्रचितीला असं फिरायचं होतं!! गंमत म्हणजे ती भजन सुरु असताना एकदाही रडली नाही!! छान रमली होती!!! तेवढाच आमच्या सखीला free time मिळाला! पण माझा वेळ पिल्लाबरोबर खुप छान गेला", असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, जुईच्या घरी दरवर्षी दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी ती कायम वेळ काढून हजर राहते.
 

Web Title: marathi actress Jui does special duty Shared a cute video