"अंगावर शहारे आले!", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी देशपांडेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 19:43 IST2024-03-26T19:42:42+5:302024-03-26T19:43:45+5:30

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी देशपांडे थक्क, म्हणाली, "गेल्या कित्येक महिन्यांपासून..."

marathi actress gautami deshpande shared special post after watching randeep hooda swatantryaveer savarkar movie | "अंगावर शहारे आले!", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी देशपांडेची पोस्ट

"अंगावर शहारे आले!", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी देशपांडेची पोस्ट

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातून वीर सावरकरांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनेही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी पोस्ट लिहिली आहे. 

गौतमी देशपांडेने नुकतंच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी थक्क झाली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी गौतमीने पोस्ट शेअर करत हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर केली आहे. "हा सिनेमा नक्की पाहा...वीर सावरकर की जय असं लोक म्हणत होते आणि टाळ्या वाजवत होते तेव्हा अंगावर शहारे आले. गेल्या कित्येक महिन्यांपासून या सिनेमाची वाट पाहत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाला १०० वर्ष हवे होते. हा सिनेमा बनवल्याबद्दल रणदीप हुड्डाचे आभार", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारण्याबरोबरच या सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे.रणदीप हुड्डाबरोबर या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 

Web Title: marathi actress gautami deshpande shared special post after watching randeep hooda swatantryaveer savarkar movie