अखेर गौतमी देशपांडे झाली मिसेस तेंडुलकर; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला अभिनेत्रीचा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 01:00 PM2023-12-25T13:00:05+5:302023-12-25T13:01:07+5:30

Gautami deshpande: गौतमी आणि स्वानंद यांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला आहे.

marathi actress gautami deshpande married-Swanand Tendulkar marathi-style-wedding-photos-out | अखेर गौतमी देशपांडे झाली मिसेस तेंडुलकर; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला अभिनेत्रीचा लग्नसोहळा

अखेर गौतमी देशपांडे झाली मिसेस तेंडुलकर; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला अभिनेत्रीचा लग्नसोहळा

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे जोरदार वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच अभिनेत्री गौतमी देशपांडे (gautami deshpande) हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) याच्यासोबत गौतमीने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गौतमी सातत्याने तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत होती. अखेर तिने स्वानंदसोबत लग्न करुन चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. गौतमी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे तिने तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे, विधींचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांना सुद्घा ऑनलाइन पद्धतीने का होईना पण गौतमीच्या लग्नाचा भाग होता आलं.

गौतमीने मराठमोळ्या पद्धतीने स्वानंदसोबत लग्नगाठ बांधली आहे. यावेळी तिने  मोती आणि गोल्ड कलरची छान साडी नेसली होती. सोबतच लाइट पिंक रंगाचं त्याला साजेसं ब्लाऊजही परिधान केलं होतं. तिच्या या लूकला मॅच होणारा हलकासा मेकअप आणि साधीशी हेअर स्टाइलही तिने केली होती. विशेष म्हणजे तिचा हा लूक प्रचंड सुंदर दिसत होता. तर, स्वानंदनेही गौतमीच्या साडीला मॅच होईल अशी शेरवानी परिधान केली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर गौतमी आणि स्वानंद यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ क्षणार्थात व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर सारंग साठ्ये यानेही या जोडीचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात लफडी गँगमध्ये स्वागत असं भन्नाट कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
 

Web Title: marathi actress gautami deshpande married-Swanand Tendulkar marathi-style-wedding-photos-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.