आनंद दिघे यांच्या बहिणीची मराठी अभिनेत्रीने घेतली भेट, म्हणते- "आमच्या कलाकारांना प्रेमाने जेवू घालणाऱ्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:39 IST2024-09-19T14:38:36+5:302024-09-19T14:39:02+5:30

'धर्मवीर २'ची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री गार्गी फुलेंनी आनंद दिघे यांच्या बहिणीची भेट घेतली. 

Marathi actress gargi phule meets dharmveer anand dighe sister shared special post | आनंद दिघे यांच्या बहिणीची मराठी अभिनेत्रीने घेतली भेट, म्हणते- "आमच्या कलाकारांना प्रेमाने जेवू घालणाऱ्या..."

आनंद दिघे यांच्या बहिणीची मराठी अभिनेत्रीने घेतली भेट, म्हणते- "आमच्या कलाकारांना प्रेमाने जेवू घालणाऱ्या..."

सध्या धर्मवीर २ या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता धर्मवीर २ काही दिवसांतच प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे. धर्मवीर २ची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री गार्गी फुलेंनी आनंद दिघे यांच्या बहिणीची भेट घेतली. 

निळू फुले यांची लेक गार्गी फुले यादेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. गार्गी फुले सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांनी नुकतंच आनंद दिघे यांच्या बहिणीची भेट घेत पोस्ट शेअर केली आहे. 

गार्गी फुले यांची पोस्ट 

आमच्या कलाकारांना प्रेमाने जेवू घालणाऱ्या आणि प्रेमाने सगळ्यांचं करणाऱ्या मम्मी फासे यांच्याकडे अनेक वर्षांनी जेवणाचा योग आला. 

किती positivity आणि प्रेम भरभरून आहे या बाई मध्ये. हाताला तर कमाल चव...चिकन, मासे तर आहेच पण साधा veg स्वयंपाकसुद्धा अप्रतिम असतो त्यांचा...

कधी लोणावळ्याला गेलात तर नक्की भेट द्या...जोशी होमली किचनला...हे लोणावळा गावात एका बैठ्या बंगल्यामध्ये आहे...High way वर मम्मी किचन आहे ते यांचं नव्हे...अनेक जण फसतात आणि तिथे जातात.

तळ टीप - श्री.आनंद दिघे यांची बहीण आहे हे माहिती आहे 


गार्गी फुले यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. दरम्यान, धर्मवीर २ सिनेमा २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Marathi actress gargi phule meets dharmveer anand dighe sister shared special post