'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:34 IST2026-03-25T15:31:41+5:302026-03-25T15:34:53+5:30
आता 'ठरलं तर मग' मध्ये येणार नाही का? चाहतीच्या त्या प्रश्नावर अभिनेत्री स्पष्ट शब्दांत म्हणाली...

'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर
Tharla Tar Mag Serial: छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील सायली- अर्जुनसह प्रत्येक पात्राने आता घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. दरम्यान, या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. वात्सल्य आश्रम केस, नागराज आणि महिपतला झालेली अटक या सगळ्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आली आहे. मात्र,मागील काही महिन्यांपासून मालिकेतून एक पात्र गायब आहे. ते म्हणजे कुसुमताईचं.या मालिकेत सायलीच्या मैत्रीण म्हणजेच कुसुम ताईची भूमिका अभिनेत्री दिशा दानडेने साकारली आहे.
ठरलं तर मग मध्ये कुसुमताईचं पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा दानडे मालिकेत काही दिवसांपासून झळकली नाही. त्यामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. या सगळ्या चर्चांवर स्वत दिशाने प्रतिक्रिया देत. या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.दरम्यान, ठरलं तर मग मालिकेत कुसुम ताईची भूमिका साकारणाऱ्या दिशाची मी जिंकून घेई सारं मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेत तिच्या भूमिकेचं नाव बेबी आत्या आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अभिनेत्रीला तिच्या एका चाहतीने थेट प्रश्न विचारला आहे. "ताई आता तुम्ही ठरलं तर मग मालिकेत दिसणार नाही का? चाहतीच्या त्या प्रश्नाने अभिनेत्री भारावून गेली आहे. तिच्या त्या प्रश्नावर उत्तर देत तिने म्हटलंय,"तिथे पण येईन... नक्की...". अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.

दिशाचं हे उत्तर ऐकून अनेक चाहते सुखावले आहेत. तिच्या प्रतिक्रियेनुसार अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतलेला नाही, हे स्पष्ट होतंय. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.