वहिनीसाहेबांचा चिमुकला वारकरी पाहिलात का?; वारकरी वेशातील कबीरचा गोड व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 18:14 IST2022-07-10T18:13:50+5:302022-07-10T18:14:42+5:30
Dhanashri kadgaonkar: अभिनेत्री धनश्री काडगांवकरने इन्स्टाग्रामवर तिच्या चिमुकल्या वारकऱ्याचा म्हणजेच कबीर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

वहिनीसाहेबांचा चिमुकला वारकरी पाहिलात का?; वारकरी वेशातील कबीरचा गोड व्हिडीओ व्हायरल
कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी आज वारकऱ्यांनी पंढरपुरात जाऊन विठोबाचं दर्शन घेतलं. त्यामुळे सध्या सर्वत्र आषाढी- एकादशीची चर्चा आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या दिवसाचं निमित्त साधत काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेबदेखील अपवाद नाहीत. अभिनेत्री धनश्री काडगांवकरने इन्स्टाग्रामवर तिच्या चिमुकल्या वारकऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली धनश्री बऱ्याचदा तिच्या लेकाचे म्हणजे कबीरचे फोटो वा व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने आषाढी एकादशीचं निमित्त साधत कबीरचा छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला कबीर वारकरी झाला असून त्याने धोतर, सदरा, गळ्यात माळ असा गेटअप केला आहे.
दरम्यान, सध्या चिमुकल्या कबीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा हा गोड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. धनश्री सध्या कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. ती तिचा जास्तीत जास्त वेळ कबीरला देत आहे.