लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अजय देवगणच्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटात केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:04 IST2025-11-25T18:02:00+5:302025-11-25T18:04:18+5:30
मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! लग्नपत्रिका पाहिलीत का?

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अजय देवगणच्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटात केलंय काम
Bhaghyashree Nhalve: मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांची सध्या लगीनघाई सुरु असल्याची पाहायला मिळतेय. येत्या काळात बरेच कलाकार लग्नबंधनात अडकून त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. याशिवाय प्राजक्ता गायकवाड, शिवानी नाईक, कोमल कुंभार या कलाकारांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. आता या यादीत आणखी एक नाव समील झालं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या २ डिसेंबरला ही अभिनेत्री लग्न करणार आहे. भाग्यश्रीने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर तिच्या नात्याची कबुली दिली आहे. शिवाय लग्न पत्रिकेचा फोटो देखील शेअर केला आहे. भाग्यश्रीचा होणारा नवरा हा डॉक्टर आहे.

भाग्यश्री न्हावलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिकाविश्व देखील गाजवलं आहे. 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसंच 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे.
'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' सिनेमात केलंय काम
'तान्हाजी'च्या निमित्ताने अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेला अजय आणि काजोलसोबत काम करण्याची संधी मिळाली.'तान्हाजी'मध्ये भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा वठविली.