फुलांची सजावट, पंचपक्वानांचा बेत! मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई, केळवणाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:53 IST2025-11-27T11:50:59+5:302025-11-27T11:53:44+5:30
आली लग्नघटिका समीप! थाटात पार पडलं अभिनेत्रीचं केळवण, फोटो आले समोर

फुलांची सजावट, पंचपक्वानांचा बेत! मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई, केळवणाचे फोटो आले समोर
Bhaghyashree Nhalve: सध्या सगळीकडे लगीनसराईला सुरुवात झाली आहे. मराठी कलाविश्वातही आता लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांतच अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. प्राजक्ता गायकवाड, एतिशा सांझगिरी,भाग्यश्री न्हालवे तसेच बिग बॉस फेम सूरज चव्हाण असे बरेचजण बोहल्यावर चढणार आहेत.यापैकीच एक भाग्यश्रीच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे.याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेतून भाग्यश्रीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.याशिवाय अजय देवगणच्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटात देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. अलिकडेच भाग्यश्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. आता लवकरच ती बोहल्यावर चढणार आहे.
भाग्यश्री न्हालवेने अगदी काही दिवसांपूर्वीच 'New Begginnig...' म्हणत तिच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यासोबत
तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही रोमॅन्टिक फोटो सुद्धा शेअर केले होते. भाग्यश्रीचा होणारा नवरा डॉक्टर आहे.आता केळवण पार पडल्यावर ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.