"माझ्या मुलीकडे पाहून त्याची लाळ गळत होती", अतिशा नाईक यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "मी त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 15:37 IST2023-09-02T15:37:01+5:302023-09-02T15:37:41+5:30

अतिशा नाईक यांनी शेअर केला मुलीबरोबर घडलेला प्रसंग, म्हणाल्या...

marathi actress atisha naik shared bad experience happened with her daughter | "माझ्या मुलीकडे पाहून त्याची लाळ गळत होती", अतिशा नाईक यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "मी त्याला..."

"माझ्या मुलीकडे पाहून त्याची लाळ गळत होती", अतिशा नाईक यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "मी त्याला..."

‘घाडगे आणि सून’, ‘सुंदरी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अतिशा नाईक या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. ‘वेक अप सिद’, ‘प्राण जाए पर शान ना जाए’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. अभिनयाबरोबरच अतिशा नाईक त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी खास करुन ओळखल्या जातात.

अतिशा यांनी नुकतीच 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी अगदी दिलखुलासपणे व्यक्त केल्या. अतिशा यांनी या मुलाखतीत त्यांच्या मुलीबरोबर घडलेला एक प्रसंगही सांगितला. “माझी मुलगी आणि मी एकमेकींमध्ये लुडबूड करत नाही. तुला जे वापरायचं आहे ते वापर. पण, त्यात तुला स्वत:ला सांभाळता आलं पाहिजे. तसं होत नसेल, तर ती तुमची जबाबदारी आहे. मुलगी म्हणून तुझी छेड काढली, त्रास दिला, तर त्याची प्रतिकार करण्याची ताकद आहे का? ती असेल, तर तुम्ही कशातही कंमफर्टेबल राहू शकता,” असं त्यांनी सांगितलं.

"मासिक पाळीबद्दल वडिलांना आधी सांगितलं", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, "त्यांनी मला..."

पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या मुलीबरोबर फिरताना मी अनेकदा लोकांची लाळ गळताना पाहिली आहे. एका माणसाला मी समोर बघ खड्डा आहे. तिच्याकडे बघताना पडशील, असं म्हणाले होते. पण, म्हणून मी सगळ्यांना बोलू शकत नाही. काय कर किंवा करू नकोस. कोणते कपडे घाल या गोष्टी मी कोणालाच सांगू शकत नाही. हा प्रत्येकाचा निर्णय आहे. माझ्या मुलीलाही मी स्वतंत्र दिलेलं आहे. त्यामुळे मी तिला काय कर हे सांगतही नाही आणि विचारतही नाही.”

अतिशा नाईक यांनी बालकलाकार म्हणूनच अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक नाटकांतही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: marathi actress atisha naik shared bad experience happened with her daughter