आली लग्नघटिका समीप! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, ग्रहमख विधी पडला पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:25 IST2026-01-18T12:22:58+5:302026-01-18T12:25:39+5:30
लगीनघाई! 'अशोक मा.मा' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, शेअर केले ग्रहमख विधीचे फोटो

आली लग्नघटिका समीप! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, ग्रहमख विधी पडला पार
Rasika Wakharkar: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये इंडस्ट्रीतील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. तर काहींनी सोशल मीडियावर नात्याची कबुली देत, त्यांचं नातं जगजाहिर केलं. अशातच येत्या काही दिवसांतही मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री रसिका वाखारकर.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशोक मा.मा मालिकेतून घराघरात पोहोचलेली रसिका वाखारकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या विधींना सुरुवातही झाली आहे.नुकताच तिचा ग्रहमख सोहळा पार पडला. त्याचे फोटो अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.रसिका लवकरच शुभंकर उंब्रानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ग्रहमख विधीसाठी रसिकाने नारंगी रंगाची साडी नेसली होती. ज्यावर चंद्रकोरची डिझाइन आहे. तसंच या सुंदर साडीवर तिने मोजके दागिने परिधान केले होते आणि गजरा घातला होता. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत कौमुदीचा ग्रहमख सोहळा पार पडला.
२०२५ वर्षा अखेरीस रसिका वाखारकरने चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर तिचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून रसिकाच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता लवकरच प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे.
रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. रसिका
अलिकडेच 'अशोक मा.मा.' या मालिकेत पाहायला मिळाली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.