Bride To Be: गर्ल गँगसोबत रंगली मराठी अभिनेत्रीची बॅचलर पार्टी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम, तुम्ही ओळखलंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:15 IST2026-01-05T10:13:34+5:302026-01-05T10:15:56+5:30

'अशोक.मा.मा' फेम  अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात

marathi actress ashok mama serial fame rasika wakharkar bachelor party shared special video on social media  | Bride To Be: गर्ल गँगसोबत रंगली मराठी अभिनेत्रीची बॅचलर पार्टी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम, तुम्ही ओळखलंत?

Bride To Be: गर्ल गँगसोबत रंगली मराठी अभिनेत्रीची बॅचलर पार्टी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम, तुम्ही ओळखलंत?

Rasika Wakharkar: अलिकडच्या दिवसांमध्ये मराठीकलाविश्वातील बरेच कलाकार बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. प्राजक्ता गायकवाड, बिग बॉस फेम सूरज चव्हाण तसेच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, कोमल कुंभार  अशा अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनगघाई सुरु झाली आहे. अशोक.मा.मा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका वाखारकरला ओळखलं जातं. आता लवकरच  रसिका बोहल्यावर चढणार आहे. तिचा साखरपुडा अलिकडेच सप्टेंबर महिन्यात पार पडला होता. सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. 


दरम्यान, गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर रसिका वाखारकरने साखरपुडा केल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. शिवाय पहिल्यांदाच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह फोटो शेअर केला होता. नुकतीच तिने 'ब्राईड टू बी' पार्टी साजरी केल्याचं पाहायला मिळतंय. आता लग्नाआधी ती आपल्या मैत्रिणींबरोबर बॅचलर पार्टीसाठी गेली आहे. काही दिवसांपूर्वी  रसिकाचं  अभिनेते अशोक सराफ यांच्या घरी केळवण पार पडलं. अभिनेत्रीने  आपल्या जवळच्या मैत्रिणींसह बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली आहे. याचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून रसिका वाखारकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव  शुभांकर  असं आहे. 

रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. रसिका सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत आहे. रसिका आणि शुभांकर साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची सर्वांना उत्सुकता  आहे. 

Web Title : मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर की बैचलर पार्टी: गर्ल गैंग के साथ मस्ती।

Web Summary : 'अशोक मा.मा' के लिए जानी जाने वाली मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर जल्द ही शुभंकर से शादी करने वाली हैं। सितंबर में सगाई के बाद, उन्होंने दोस्तों के साथ बैचलर पार्टी मनाई, जिसके बाद अशोक सराफ के घर पर एक पारंपरिक 'केळवण' हुआ। वह पहले 'तुझ्या पिरतीचा वनवा उरी पेटला' में अभिनय कर चुकी हैं।

Web Title : Marathi actress Rasika Wakharkar's bachelorette party: Fun with girl gang.

Web Summary : Marathi actress Rasika Wakharkar, known for 'Ashok Ma.Ma', is set to marry Shubankar soon. After engagement in September, she celebrated a bachelorette party with friends, following a traditional 'Kelvan' at Ashok Saraf's home. She previously starred in 'Tujhya Piraticha Vanva Uri Petla'.