Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:46 IST2022-03-29T11:46:00+5:302022-03-29T11:46:31+5:30

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. यात कधी सेटवरील तर कधी कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते.

marathi actress arundhati aka madhurani gokhale summer special cool look viral | Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. या मालिकेत मधुराणी अरुंधती ही मुख्य भूमिका साकारत आहे. उत्तम अभिनयशैलीमुळे अरुंधतीने अल्पावधीत प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती कायम प्रयत्न करत असते. यात अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना उन्हाळ्यात काळजी घ्या असं आवाहन केलं आहे.

मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. यात कधी सेटवरील तर कधी कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मधुराणीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिने हातात छत्री घेतली असून गॉगलही लावला आहे. सोबतच ''उन्हाळा वाढतोय ...काळजी घ्या मंडळी'', असं कॅप्शनही या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे मधुराणीला चाहत्यांची काळजी वाटत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत रंजकदार वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अरुंधतीच्या कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्यांना तिने खडे बोल सुनावल्याचं दिसून येत आहे.

Web Title: marathi actress arundhati aka madhurani gokhale summer special cool look viral