आनंदघन येई घरा! जोश्यांची सून होणार अपूर्वा गोरे, सासरच्या मंडळींसोबत शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:23 IST2026-02-04T15:23:12+5:302026-02-04T15:23:36+5:30

अपूर्वाने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा

marathi actress apurva gore shared photo with future husband anshuman joshi and family | आनंदघन येई घरा! जोश्यांची सून होणार अपूर्वा गोरे, सासरच्या मंडळींसोबत शेअर केला फोटो

आनंदघन येई घरा! जोश्यांची सून होणार अपूर्वा गोरे, सासरच्या मंडळींसोबत शेअर केला फोटो

मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकार प्रेमाची  कबुली देत आहे. नुकतंच सिद्धार्थ खिरीडचं लग्न झालं. त्याआधी पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी, अनुष्का पिंपुटकर यांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली. तर मधल्या काळात गायत्री दातार, रेवती लेले आणि अशातच अभिनेत्री अपूर्वा गोरे यांनी होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना खूशखबर दिली.  अपूर्वा गोरेचा होणारा नवरा कोण हे काल नेटकऱ्यांनी शोधून काढलं होतं. तर आता अपूर्वाने स्वत: होणारा नवरा आणि सासरच्या मंडळीसोबत फॅमिली फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री अपूर्वा गोरेने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. हिरव्या साडीत अपूर्वा सुंदर दिसत आहे. तर अखेर या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसला आहे. तर हा आहे अभिनेता अंशुमन जोशी. २०१२ साली आलेल्या 'शाळा' सिनेमात अंशुमनने भूमिका साकारली होती. केतकी माटेगावकरसोबत तो झळकला होता. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोत तिचं आणि अंशुमनचे कुटुंबीय दिसत आहे. "आनंदघन येई घरा..introducing you all गोरेंचा जावई अंशुमन जोशी आणि जोश्यांची सून अपूर्वा गोरे...आम्हाला एकत्रितपणे बांधून ठेवणारे आणि आमच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणारे कुटुंबीय मिळाले हे आमचं भाग्यच आहे. आमचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे" असं कॅप्शन अपूर्वाने दिले आहे. 


सध्या अपूर्वा गोरे 'शेवग्याचा शेंगा' या नाटकात काम करत आहे. तिच्यासोबत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर आहेत. याआधी ती 'आई कुठे काय करते'  मालिकेत ईशाच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. 

अंशुमन जोशी आता काय करतो?

'शाळा'हा सुपरहिट सिनेमा केल्यानंतर अंशुमन मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाला. सध्या तो साउथ सिनेमांमध्ये सक्रीय आहे. अंशुमन पडद्यावर दिसत नसला तरी तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे. एक अभिनेता असण्यासोबत तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे.कोकण या युट्यूब सीरिजमध्ये तो दिसला होता. अंशुमनने मल्याळम सिनेमातही काम केलं आहे.२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या थँकम सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला साऊथ सिनेमा होता.

Web Title : अपूर्वा गोरे अंशुमन जोशी से करेंगी शादी; परिवार की तस्वीर साझा की!

Web Summary : अभिनेत्री अपूर्वा गोरे अभिनेता अंशुमन जोशी से शादी करने जा रही हैं। अपूर्वा ने अंशुमन और उनके परिवारों के साथ एक पारिवारिक तस्वीर साझा की, जिसमें उन्होंने अपनी खुशी व्यक्त की। 'शाला' के लिए जाने जाने वाले अंशुमन अब दक्षिण भारतीय सिनेमा में सक्रिय हैं।

Web Title : Apurva Gore to marry Anshuman Joshi; shares family photo!

Web Summary : Actress Apurva Gore is set to marry actor Anshuman Joshi. Apurva shared a family photo with Anshuman and their families, expressing her joy. Anshuman, known for 'Shala,' is now active in South Indian cinema.