"पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची?", शिवानी नाईकला दिसण्यावरून केलेलं ट्रोल, होणाऱ्या नवऱ्याने 'अशी' दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:12 IST2025-11-05T13:06:34+5:302025-11-05T13:12:26+5:30
'अप्पी आमची कलेक्टर' फेम शिवानी नाईकला करावा लागला ट्रोलिंगचा सामना, सांगितला कठीण काळ

"पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची?", शिवानी नाईकला दिसण्यावरून केलेलं ट्रोल, होणाऱ्या नवऱ्याने 'अशी' दिली साथ
Shivani Naik And Amit Rekhi: ‘अप्पी आमची कलेक्टर’या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. या मालिकेत शिवानीने साकारलेल्या ‘अप्पी’ म्हणजेच आयपीएस ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिकेने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.नुकताच शिवानी नाईकचा साखरपुडा पार पडला.तिच्या सााखरपुड्याला इंडस्ट्रीतील दिग्गज मंडळी देखील उपस्थित लावली होती. शिवानी प्रमाणेच तिचा होणारा नवरा अमित सुद्धा उत्तम अभिनेता आहे. नुकतीच या जोडप्याने साखपुड्यानंतर मुलाखत दिली त्यामुळे हे नवोदित कपल चर्चेत आलं आहे.
नुकतीच या जोडप्याने इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित आणि शिवानीने त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांविषयी खुलेपणाने भाष्य केलं. त्यादरम्यान, शिवानीला ट्रोलिंगविषयी तसेच कठीण काळात अमितने कशी साथ दिली होती, याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अमित म्हणाला, "मुळात त्यावेळेस ती स्वत: खूप स्ट्रॉंग होती. तिला पाठबळ द्यायला तिचे आणि माझे आई-वडील आम्ही सगळे होतोच. तिला तेव्हा ट्रोल केलं जायचं, पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची. पण,तिने मला तेव्हा देखील एक गोष्ट सांगितलं होती, हेच लोकं पुढे माझ्यावर खूप प्रेम करतील. असं सकारात्मक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्या माणसाला पाठिंबा देऊ पण मेन्टली काय करणार, समोरच्या माणसाचे विचार आपण बदलू शकत नाही.त्या काळात शिवानीने तिचे विचार कणखर बनवले."
पुढे अमित रेखीने सांगितलं," त्यावेळी तिची श्वेता शिंदेंनी थेरिपी देखील केली होती. तिच्या चेहऱ्यावर लिच लावले होते. तिला पंचकर्मा करायचे होते.मला आजही शिवानी त्या हॉस्पिटलच्या कपड्यांमधील लूक आठवतो. त्याचं असं म्हणणं होतं की शिवानीला जर त्रास होतोय तर आपण ट्रिटमेन्ट करुया. त्यांनी मग तिची ती ट्रिटमेन्ट प्लॅन केली होती." ही ट्रिटमेन्ट फार त्रासदायक होती, असंही शिवानीने या मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान,शिवानी नाईक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.अप्पी आमची कलेक्टर मालिकेचं नाव जरी आठवलं तरी आजही डोळ्यासमोर तिचा चेहरा येतो. तर अभिनेत्रीचा होणारा पती अमित रेखीने ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.