'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदिती बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीला मानते फॅशन आयकॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:49 IST2022-01-19T14:20:44+5:302022-01-19T14:49:03+5:30
झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujha Majha Sansarala Aani Kay Hava) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदिती बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीला मानते फॅशन आयकॉन
झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujha Majha Sansarala Aani Kay Hava) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेतील प्रमुख जोडी सिड आणि अदिती देखील प्रेक्षकांची आवडती आहे.आता हि मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर सीड आणि अदितीचं लग्न झालं.
या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारतेय. अमृता तिच्या स्टाईल आणि अभिनय कौशल्याने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. पण अमृताची आवडती अभिनेत्री आहे आलिया भट.आलिया भटची स्टाईल अमृताला आवडते.
त्याबद्दल बोलताना अमृता म्हणाली, "मला आलिया भट्ट हिची स्टाईल खूप आवडते. तिचे सर्व कपडे खूपच कंफर्टेबल असतात. ती स्वतः ‘आउट ऑफ द वे’ जाऊन काही परिधान करत नाही. ती स्वतः त्यामध्ये खूपच कंफर्टेबल दिसते. तसेच, तिच्या चेहऱ्यावरही खूप आमविश्वास दिसतो. त्यामुळेच आलिया ही माझी फॅशन आयकॉन आहे."