अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:58 IST2024-05-06T15:57:37+5:302024-05-06T15:58:20+5:30

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया नाईक प्रेग्नंट?

marathi actress Akshaya Naik Shares baby bump photo Fans confused Said When she got married | अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?'

अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?'

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया नाईकचे (Akshaya Naik) अनेक चाहते आहेत. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. नुकतंच अक्षयाने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये चक्क तिचा बेबी बंप दिसत आहे. पण तिने लग्नच कधी केलं असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. नक्की प्रकरण काय बघा.

अक्षया नाईकने लाल कुर्ता आणि ब्लॅक प्लाझो परिधान केलं आहे. तिच्या हातात चहाचा कप आहे. बेबी बंप शो ऑफ करत ती कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. 'सबको करुंगी हाय, थंडी हो या गर्मी रोज पिऊंगी चाय' असं कॅप्शन तिने दिलं आहे. अक्षयाने बेबी बंपसोबत शेअर केलेला फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

अखेर तिच्या या पोस्टवर तिनेच उत्तर देत हे एका भूमिकेसाठी असल्याचा खुलासा केला आहे. ती लिहिते, "मित्रहो, तर्क वितर्क लावणं बंद करा. मी साकारत असलेल्या एका भूमिकेवेळचा हा फोटो आहे.' तर हा फोटो तिच्या शूटच्या सेटवरचा आहे.'पॉकेट fm पॉडकास्ट एक लडकी को देखा तो' साठीचा तिचा हा लूक होता असं शेवटी एका चाहतीनेच कमेंटमध्ये सांगितलं. ती कमेंट वाचून अक्षयाही प्रभावित झाली.

Web Title: marathi actress Akshaya Naik Shares baby bump photo Fans confused Said When she got married