पाठक बाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरचं व्यवसायात पहिलं पाऊल, सुरू केला नवा ब्रँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:15 IST2024-08-01T15:11:44+5:302024-08-01T15:15:01+5:30
अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अक्षयाने आता व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. अक्षयाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

पाठक बाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरचं व्यवसायात पहिलं पाऊल, सुरू केला नवा ब्रँड
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने पाठक बाई ही भूमिका साकारली होती. या मालिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळवून दिली होती. अभिनयाबरोबरच अक्षया तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अक्षयाने आता व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. अक्षयाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत हिंट दिली होती. काहीतरी नवीन सरप्राइज चाहत्यांना मिळणार असल्याचं तिने म्हटलं होतं. अखेर अक्षयाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. अक्षयाने भरजरी नावाचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. हा एक साडीचा ब्रँड असणार आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. "‘भरजरी’ - नाम (निधी, अक्षया आणि माधुरी)...आम्हा तिघींच हे स्वप्न... प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेलं. एकत्र येऊन पूर्ण करत आहोत. तुमच्या साथीने, विश्वासाने आणि प्रेमाने हे पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या ‘भरजरी’चे नवीन दालन लवकरच सुरू होत आहे. प्रेम कायम असू दे...आमच्यावरही आणि आपल्या ‘भरजरी’वरही", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अक्षयाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. तसंच या व्यवसायासाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, अक्षयाने अभिनेता हार्दिक जोशीबरोबर डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऑनस्क्रीन राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही खुश होते. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. पण, लग्नानंतर मात्र अक्षया स्क्रीनपासून दूरच असल्याचं पाहायला मिळत आहे.