पाठकबाई देतायेत शिल्पा शेट्टीला टक्कर; 'दिलने ये कहाँ'वर अक्षयाने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:39 IST2022-01-25T17:39:03+5:302022-01-25T17:39:56+5:30
Akshaya deodhar: अलिकडेच अक्षयाने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया 'धडकन' या चित्रपटातील 'दिलने ये काहाँ हैं दिलसे' या गाण्यावर रिल करतांना दिसत आहे.

पाठकबाई देतायेत शिल्पा शेट्टीला टक्कर; 'दिलने ये कहाँ'वर अक्षयाने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत अक्षयाने अंजली पाठक म्हणजेच पाठकबाई ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका इतकी प्रचंड गाजली की आज याच नावाने तिला अनेक जण ओळखतात. अक्षया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे काही व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला असून अनेकांचं लक्ष तिने वेधून घेतलं आहे.
अलिकडेच अक्षयाने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया 'धडकन' या चित्रपटातील 'दिलने ये काहाँ हैं दिलसे' या गाण्यावर रिल करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने दिलेल्या एक्स्प्रेशन्समुळे अनेक जण घायाळ झाले आहेत. इतकंच नाही तर या एक्स्प्रेशन्समुळे ती शिल्पा शेट्टीला टक्कर देतीये की काय? असं नेटकरी म्हणत आहेत.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये अक्षया नदीकिनाऱ्यावर बसली असून तिने काळ्या रंगाचं जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. तसंच तिचा हा व्हिडीओ yogendra_chavhan यांनी शूट केला आहे. सध्या अक्षयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.