अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:18 IST2025-08-23T10:15:13+5:302025-08-23T10:18:54+5:30

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! 'या' मराठी नायिकाचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव काय माहितीये?

marathi actress aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar started new clothing brand share good news with fans | अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

Marathi Actress launch new clothing Brand: सिनेइंडस्ट्रीत नाव आहे, पैसाही आहे. पण हे क्षेत्र बेभरवशाचं असतं असं म्हटलं जातं. आज हाती काम आहे तर उद्या नाही. त्यामुळे हल्ली  बरेचसे कलाकार व्यवसायाकडे वळले आहेत.तर काहींनी वेगळ्या क्षेत्रात प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या व्यवसायात ठसा उमटवण्यास सुरूवात केली आहे.अशातच मराठी कला विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री असणाऱ्या  त्यांची नवी इनिंग सुरु करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 


'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत असताना अभिनेत्री तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्यात एक छान मैत्रीचं बॉण्ड तयार झालं होतं.अशातच आता मालिका संपल्यानंतरही या तिघींनी नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. नेहमी कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिलेल्या या अभिनेत्री आता पडद्यामागची भूमिका बजावताना दिसणार आहे. ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी कपड्यांचा नवा ब्रॅंड सुरु केला आहे. by 'तस्वी' असं त्यांच्या या नव्या क्लोथिंग ब्रॅंडचं नाव आहे.सोशल मीडियावर याबाबत  खास पोस्ट शेअर करत या तिघींनी चाहत्यांना माहिती दिली आहे.  थ्रेड अँड ठुमकाच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यांवर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नावाच्या अद्याक्षरांपासून ब्रॅंडचं 'तस्वी' असं नाव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हे नाव आकर्षणाचा विषय ठरत आहे. सध्या मराठी कलाविश्वात या त्रिकुटाच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. त्यांच्या या व्हिडीओवर  अभिनेत्री ऋतुजा बागवेने कमेंट करत लिहिलंय, "कडक... अभिनंदन...!", तर रुजुता देशमुखने "वाह वाह अभिनंदन आणि शुभेच्छा...",अशी प्रतिक्रिया देत या तिघींचं कौतुक केलं आहे. 

Web Title: marathi actress aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar started new clothing brand share good news with fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.