ऐश्वर्या-अविनाश यांच्या प्रेमाची 28 वर्ष; मराठीतील एव्हरग्रीन कपलचं जंगी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 08:53 IST2023-12-04T08:53:29+5:302023-12-04T08:53:58+5:30

Aishwarya-avinash narkar: या जोडीने घरच्या घरी पण थाटात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

marathi-actress-aishwarya-narkar-and-avinash-narkar-28th-marriage-anniversary Celebration | ऐश्वर्या-अविनाश यांच्या प्रेमाची 28 वर्ष; मराठीतील एव्हरग्रीन कपलचं जंगी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन

ऐश्वर्या-अविनाश यांच्या प्रेमाची 28 वर्ष; मराठीतील एव्हरग्रीन कपलचं जंगी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) आणि अविनाश नारकर (avinash narkar). उत्तम अभिनयशैली आणि मनमोकळा स्वभाव यामुळे या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी कलाविश्वात सक्रीय आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही ते चांगलेच ॲक्टीव्ह आहे. त्यामुळे त्यांच्याती बॉण्डिंग, प्रेम कायमच नेटकऱ्यांना पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या जोडीने नुकताच त्यांच्या लग्नाचा २८ वा वाढदिवस साजरा केला.

३ डिसेंबर १९९५ मध्ये ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीने लग्नगाठ बांधली. नुकतीच त्यांच्या लग्नाला २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या जोडीने घरच्या घरी त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे लग्नाला २८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या प्रेमातील गोडवा टिकून आहे. त्यामुळे नेटकरी सध्या त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश कायम एकमेकांसोबतचे भन्नाट रिल्स, व्हिडीओ शेअर करत असतात. या जोडीने आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

Web Title: marathi-actress-aishwarya-narkar-and-avinash-narkar-28th-marriage-anniversary Celebration