अदिती द्रविडने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्याबरोबर केलं लग्न? फोटो पाहून सेलिब्रिटीही पेचात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:00 IST2024-06-07T10:59:46+5:302024-06-07T11:00:55+5:30

अदिती द्रविडने गुपचूप केलं लग्न? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

marathi actress aditi dravid shared photo from new song fans wonder is she married | अदिती द्रविडने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्याबरोबर केलं लग्न? फोटो पाहून सेलिब्रिटीही पेचात

अदिती द्रविडने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्याबरोबर केलं लग्न? फोटो पाहून सेलिब्रिटीही पेचात

मराठी अभिनेत्री अदिती द्रविड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अदितीने नुकतंच मुंबईत घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता तिने लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे तिने लग्न केलंय की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रात्रीस खेळ चाले फेम अभिनेता साईंकित कामतबरोबरचे फोटो अदितीने शेअर केले आहेत. 

अदितीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं दिसत आहे. अदितीने लाल रंगाची साडी नेसली आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळत आहे. तर साईंकितने कुर्ता पायजमा आणि डोक्यावर टोपी घालत अत्यंत साधा लूक केला आहे. त्यांच्या मागे असलेल्या घराला विद्युत रोषणाई केल्याचंही पाहायला मिळत आहे. अदितीने हे फोटो शेअर करत "प्रेमात पडतंय, तुझ्या प्रेमात पडतंय", असं कॅप्शन दिलं आहे. अदितीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांबरोबर सेलिब्रिटीही पेचात पडले आहेत. 

अभिनेत्री सुकन्या मोनेदेखील अदितीचे हे फोटो पाहून आश्चर्यचकित झाल्या आहेत. त्यांनी अदितीच्या फोटोवर "काय गं?" अशी कमेंट केली आहे. तर काही चाहत्यांनी अदितीला शुभेच्छाही दिल्या आहेत. पण, अदितीने लग्न केलेलं नसून तिच्या नवीन गाण्यातील हा लूक आहे. अदितीने कमेंटमध्ये सांगत याबाबत असलेला गैरसमज दूर केला आहे. "हे फोटो आमच्या नवीन प्रोजेक्टमधील आहेत. गाणं पाहिलं नसेल तर नक्की पाहा", असं म्हणत तिने चाहत्यांचा संभ्रम दूर केला आहे. 

अदिती आणि साईंकितचं 'मन पाखरावानी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सारेगमपच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज झालं आहे. दरम्यान, अदितीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. बाईपण भारी देवा या सिनेमातील मंगळागौर गाण्यामुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली होती. तिने लिहिलेल्या या गाण्याला लोकप्रियता मिळाली. 

Web Title: marathi actress aditi dravid shared photo from new song fans wonder is she married