Abhidnya Bhave : नवऱ्याच्या वाढदिवशी अभिज्ञाची खास पोस्ट, म्हणाली, "तू कायम निरोगी.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:18 IST2023-05-18T17:16:51+5:302023-05-18T17:18:19+5:30
२०२१ मध्ये अभिज्ञा आणि मेहुलच्या सुखी संसाराला सुरुवात झालीच होती तोच मेहुलला कॅन्सरने ग्रासले होते.

Abhidnya Bhave : नवऱ्याच्या वाढदिवशी अभिज्ञाची खास पोस्ट, म्हणाली, "तू कायम निरोगी.."
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं जेव्हा तिचा पती मेहुल पैला (Mehul Pai) कॅन्सरचं निदान झालं. तेव्हा अभिज्ञा खंबीरपणे नवऱ्याच्या पाठिशी उभी राहिली होती आणि त्याला धीर दिला होता. सोशल मीडियावरुन तिने अनेकदा कठीण प्रसंगाला तोंड देण्याविषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. आज पतीच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने खास पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
टेलिव्हिजन विश्वात अभिज्ञा भावेने नाव कमावलं आहे. तिच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. 'खुलता कळी खुलेना' ते आत्ताची 'तू तेव्हा तशी' मध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. 2021 मध्ये अभिज्ञाने मेहुल पै सह लग्नगाठ बांधली.
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त ती लिहिते,"आज सगळे जण तुझा वाढदिवस साजरा करतील, पण मला आनंद आहे की… माझी पोस्ट पाहिल्यावर तुझ्या चेहऱ्यावर जे हास्य येईल, ते इतर कोणामुळेही येऊ शकणार नाही. तू कायम आनंदी आणि निरोगी आयुष्य जगत राहावं. आयुष्यातील अनेक उतार पार करून आता उंच चढायचं आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे…. माझ्या आयुष्यातील सर्वात जवळच्या मित्राला जो माझा नवराही आहे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो…आयुष्याची जोडीदार म्हणून तुला मी भेटले ही एक इच्छा देवाने पूर्ण केलीच आहे.”
२०२१ मध्ये अभिज्ञा आणि मेहुलच्या सुखी संसाराला सुरुवात झालीच होती तोच मेहुलला कॅन्सरने ग्रासले. अभिज्ञाच्या साथीने त्याने कॅन्सरवर मात केली आणि २०२२ मध्ये तो पूर्णपणे बरा झाला. अभिज्ञा कायम पतीच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. इतर मराठी कलाकारांनीही अभिज्ञाला तिच्या कठीण प्रसंगात साथ दिली होती.