"आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही...", हेमलता बाणे खंडणी प्रकरणी अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:53 IST2025-12-30T08:45:44+5:302025-12-30T08:53:30+5:30

"माझा मुलगा तिच्यापासून विभक्त झालाय...", १० कोटींच्या खंडणीचा आरोप, हेमलता बाणे प्रकरणी अर्चना पाटकर काय म्हणाल्या?

marathi actress aai kuthe kay karte serial fame archana patkar break silence on ex daughter in law hemlata bane arrested for 10 crore extortion case share post | "आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही...", हेमलता बाणे खंडणी प्रकरणी अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या

"आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही...", हेमलता बाणे खंडणी प्रकरणी अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या

Marathi Actress Archana Patkar Reaction Hemlata Bane Arrest: सिनेसृष्टीतील कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र, मुंबईत २८ डिसेंबर रोजी एका घटनेमुळे सध्या मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.गोरेगाव इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबईपोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात हेमलता  बाणे (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. यातील हेमलता बाणे मराठी चित्रपटच सृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगणा असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्या भूवया उंचावल्या.


हेमलता बाणे छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेत कांचन देशमुख हे पा्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची ती सून असल्याचंही म्हटलं जात होतं. हेमलताच्या अटकेनंतर याबद्दलही चर्चा झाली आहे, आता या प्रकरणी स्वत:  अर्चना पाटकर यांनी जाहीरपणे स्पष्टीकरण दिलं आहे. हेमलता आणि आपल्या कुटुंबियांचा काहीही संबध नाही, शिवाय त्यांचा मुलगा आणि हेमलता हे ४ वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचंही त्यांनी या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 

अर्चना पाटकर काय म्हणाल्या...?

अर्चना पाटकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटींच्या खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत."

यापुढे अर्चना पाटकर यांनी म्हटलंय, "मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झालाय. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद- अर्चना पाटकर". दरम्यान, अर्चना यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाई्क्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला आहे. 

काय घडलेलं?

नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी  बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइटच्या वापरावरून या महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.बांधकाम व्यावसायिकेच्या मुलावर खोटे आरोप करीत या महिलेनं आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर या दोघींनी बांधकाम व्यावसायिकेला आणि मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर ठरली. ५२ वर्षीयबिल्डरने (गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपीशी संबंधित) या त्रासाला कंटाळून गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून २३ डिसेंबर रोजी लोअर परळ येथे दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना अटक केली. 

Web Title : कोई पारिवारिक संबंध नहीं: हेमलता बाणे मामले पर अर्चना पाटकर का स्पष्टीकरण।

Web Summary : अर्चना पाटकर ने स्पष्ट किया कि जबरन वसूली के मामले में गिरफ्तार हेमलता बाणे का उनके परिवार से कोई संबंध नहीं है। उनके बेटे का 4 साल पहले तलाक हो चुका है।

Web Title : No family ties: Archana Patkar clarifies on Hemlata Bane case.

Web Summary : Archana Patkar clarifies that Hemlata Bane, arrested in extortion case, has no connection to her family. Her son is divorced since 4 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.