'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील 'राया'ने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे विशालची 'सौंदर्या'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:01 IST2026-01-12T09:56:55+5:302026-01-12T10:01:23+5:30
'येड लागलं प्रेमाचंं' मालिकेतील रायाने दिली प्रेमाची कबुली; शेअर केली रोमॅन्टिक पोस्ट, म्हणाला- "माझी सौंदर्या..."

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील 'राया'ने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे विशालची 'सौंदर्या'?
Vishal Nikam Post: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत.तर काहींनी अगदी जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली देत जोडीदाराबद्दल खुलासा केला. अलिकडेच ज्ञानदा रामतीर्थकर, गायत्री दातार या अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. लवकर त्यांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. या पाठोपाठ आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. शिवाय लवकरच हा अभिनेता बोहोल्यावर चढणार असल्याचंही कळतंय. हा अभिनेता म्हणजे विशाल निकम आहे.
'बिग बॉस मराठी ३' च्या पर्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विशाल निकम. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेत काम करतो आहे. दरम्यान, मालिकेत मंजिरीच्या प्रेमासाठी जीवाचं रान करणाऱ्या या रायाला आता त्याच्या खऱ्या आयुष्यातली मंजिरी सापडली आहे.विशाल निकमने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याची सौंदर्या जगासमोर आणली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशालला अनेकदा त्याच्या सौंदर्याबद्दल विचारलं गेलं पण आज अखेर ती सौंदर्या समोर आली आहे. मात्र,ही सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.
विशालने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्या होणाऱ्या पत्नीची झलक पाहायला मिळतेय. दरम्यान, विशालने त्याच्या या सौंदर्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे विशाल तिचा चेहरा कधी रिव्हिल करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत."माझी सौंदर्या...", असं गोड कॅप्शन देत अभिनेत्याने सोशल मीडियावर हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर, मराठी कलाकारांनी देखील त्याचं अभिनंदन केलं आहे.
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत विशालने साकारलेला डॅशिंग राया अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. विशालसह मालिकेत पूजा बिरारी मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतील राया-मंजिरीची गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे.