वैभव मांगलेने फॉलो केला बटरफ्लाय ट्रेंड; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 11:06 IST2024-03-22T11:06:09+5:302024-03-22T11:06:42+5:30
Vaibhav mangale: वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ट्रेंड फॉलो केला आहे.

वैभव मांगलेने फॉलो केला बटरफ्लाय ट्रेंड; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले (vaibhav mangale). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांची कलाविश्वात आणि सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर वैभव मांगले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ट्रेंड फॉलो केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या वैभव मांगले यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाच्या सेटवरचा असून त्यांच्यासह नाटकाच्या टीमने व्हायरल ट्रेंड फॉलो केला आहे.
सध्या सोशल मीडियावर 'बटरफ्लाय बटरफ्लाय' हे रिल प्रचंड व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांनी तो ट्रेंड फॉलो केला आहे. त्यामुळे हा ट्रेंड करण्याचा मोह वैभव मांगले यांनाही आवरला नाही. त्यामुळे त्यांनी देखील तो फॉलो केला.