लक्ष्मी आली घरा! 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:12 IST2025-12-05T11:08:57+5:302025-12-05T11:12:26+5:30
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता झाला बाबा,घरी चिमुकलीचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाला...

लक्ष्मी आली घरा! 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
Amol Naik Welcome Baby Girl: गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड मराठीतील अनेक कलाकारांनी गुडन्यूज दिल्या. काही लग्न करत नव्या आयु्ष्याला सुरुवात केली तर काही कलाकरांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. कलाक्षेत्रातील कुणाकडे मुलगा जन्मला तर, कुणाच्या घरी लक्ष्मी आली. अशातच मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच एक आनंदाची बातनी दिली आहे. हा अभिनेता अमोल नाईक आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अमोल महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने राणादाचा जीवलग मित्र बरकतची भूमिका साकारली होती.या भूमिकेतून अमोल चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. नुकतंच अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. काल दत्त जयंतीच्या दिवशी अमोलला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे.
अभिनेता अमोल नाईक याला २०१९ मध्ये अमोल नाईक आणि पूजा विवाहबद्ध झाले होते. आज लग्नानंतर ६ वर्षाने त्यांच्या घरात चिमुकली पाहुणी आली आहे. दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अक्षया देवधर, धनश्री काडगावकर, हार्दिक जोशी या त्याच्या सहकलाकारांनी कमेंट्स करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
अमोल नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'तुझ्यात जीव रंगला', 'आई तुळजाभवानी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो काही हिंदी मालिकांमध्येही झळकला आहे.