२०२४ची Happy Ending! मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:25 IST2024-12-31T10:16:43+5:302024-12-31T10:25:50+5:30
वर्ष संपत असतानाच मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

२०२४ची Happy Ending! मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती?
२०२४ या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येक जण या सरत्या वर्षाला निरोप देत नव्या आशेने आणि उमेदीने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. वर्ष संपत असतानाच मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
'फ्रेशर्स' फेम अभिनेका सिद्धार्थ खिरीदने जाहीरपणे त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला आहे. पण, यामध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये. त्यामुळे सिद्धार्थच्या आयुष्यात आलेली ती नेमकी कोण आहे, हे अभिनेत्याने अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. "फक्त २०२४ संपलेलं नाही तर माझ्या आयुष्यातील सिंगलचा अध्यायही संपला आहे", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. 'मुलगी झाली हो', 'राणी मी होणार', 'हदयी प्रीत जागते' या मालिकांमध्ये तो झळकला होता. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.