'ए मॅडम मारही डालोगी'; प्रार्थनाच्या नव्या लूकवर श्रेयस तळपदेची भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:43 IST2023-06-20T16:42:42+5:302023-06-20T16:43:33+5:30
Shreyas talpade : प्रार्थनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'ए मॅडम मारही डालोगी'; प्रार्थनाच्या नव्या लूकवर श्रेयस तळपदेची भन्नाट कमेंट
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली जोडी म्हणजे श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे (prarthana behere). 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे ही मालिका संपून आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यांची लोकप्रियता ओसरली नाही. सोशल मीडियावर ही जोडी सक्रीय आहे. त्यामुळे कायम ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. यात नुकतीच श्रेयसने(shreyas talpade ) प्रार्थनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ही कमेंट सध्या चर्चेत येत आहे.
प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने खणाची साडी नेसली असून त्यावर छान मराठमोळा साजशृंगार केला आहे. हा व्हिडीओ तिने पोस्ट केल्यानंतर अल्पावधीत त्यावर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. यात श्रेयसनेदेखील कमेंट केली आहे. 'अरे मॅडम, मारही डालोगी', अशी कमेंट श्रेयसने केली आहे. सोबतच फायर इमोजीही शेअर केली आहे.
दरम्यान, प्रार्थनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रार्थना आणि श्रेयस यांनी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत यश आणि नेहा ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं की ही मालिका पुन्हा वाढवावी लागली.