महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: March 17, 2025 15:37 IST2025-03-17T15:37:19+5:302025-03-17T15:37:44+5:30

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरचा मोबाईल चोरी गेलाला हेआ. रविवारी(१६ मार्च) ठाण्यात अभिनेत्यासोबत ही घटना घडली. गेल्याच महिन्यात संकेतने तब्बल १ लाख ७० हजारांना हा फोन विकत घेतला होता.

marathi actor sanket korlekar iphone 16 pro max gets stolled by theif in thane | महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरचा मोबाईल चोरी गेलाला हेआ. रविवारी(१६ मार्च) ठाण्यात अभिनेत्यासोबत ही घटना घडली. गेल्याच महिन्यात संकेतने तब्बल १ लाख ७० हजारांना हा फोन विकत घेतला होता. फोन चोरीला गेल्यानंतर अभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संकेतने व्हिडिओ शेअर करत त्याच्यासोबत घडलेला हा थरारक प्रसंग सांगत चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

संकेतने सांगितलं नेमकं काय घडलं? 

"नमस्कार, मी संकेत कोर्लेकर. मागच्या महिन्यात मी iPhone 16 Pro Max हा १ लाख ७० हजारांचा फोन विकत घेतला होता. काल म्हणजेच १६ मार्चला मी ठाण्यात एका मीटिंगसाठी जात होतो. तिथे विवियानाच्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर माझ्या हातातून दोन बाईकस्वारांनी मोबाईल हिसकावून चोरला. मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅप लावतो आणि तो माझ्या हातात घालतो. तुम्ही बघू शकता अजूनही रॅशेस गेलेले नाहीत. इतक्या जोरात प्रेशरने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून ते घेऊन गेले. मी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. माझा पोलिसांवर विश्वास आहे की ते कारवाई करून मला माझा फोन मिळवून देतील". 

"पण, अलर्ट व्हायचा मुद्दा हाच आहे की मी रिक्षात होतो. मी मध्ये बसलेलो असताना सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातून हिसकावून घेतला. आज मी आहे. उद्या एखादी महिला असेल. मोबाईल तर सोडाच ते १० हजारांच्या मोबाईलसाठी आसुसलेली लोकं आहेत. हे ठाण्यात घडेल असा मी अजिबातच विचार केलेला नव्हता. पण, हे घडलंय इतका चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा. मी पोलिसांनीही विनंती करतो की जितकी सुरक्षा पुरवता येईल, तेवढी द्या. मी हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की माझ्यानंतर ५ मिनिटांनी आणखी एक जण विवियाना मॉलसमोरून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आला होता. त्यामुळे ही काळजीची बाब आहे".


दरम्यान, संकेतने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. संकेतचं युट्यूब चॅनेल आहे. इन्स्टाग्रामवरही तो बहिणीसोबत अनेक व्हिडिओ बनवत असतो. पण, आता iPhone च चोरीला गेल्याने त्याची मोठी पंचायत झाली आहे. 

Web Title: marathi actor sanket korlekar iphone 16 pro max gets stolled by theif in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.