युट्यूबचं चॅनेल अन् सिल्व्हर बटण! मराठी अभिनेत्याने खरेदी केला iPhone 16 Pro, म्हणतो- "आता नवीन चॅनेल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:37 IST2025-01-14T16:37:07+5:302025-01-14T16:37:41+5:30
एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही नुकतंच iPhone खरेदी केला आहे. पण, अभिनेत्याने हा अॅपल कंपनीचा iPhone एका खास कारणासाठी विकत घेतला आहे.

युट्यूबचं चॅनेल अन् सिल्व्हर बटण! मराठी अभिनेत्याने खरेदी केला iPhone 16 Pro, म्हणतो- "आता नवीन चॅनेल..."
iPhone चे लाखो चाहते आहेत. अनेक सेलिब्रिटींकडेही iPhone आहेत. एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही नुकतंच iPhone खरेदी केला आहे. पण, अभिनेत्याने हा अॅपल कंपनीचा iPhone एका खास कारणासाठी विकत घेतला आहे. मराठी अभिनेत्याने त्याच्या युट्यूब चॅनेलसाठी हा फोन खरेदी केला आहे. iPhone घेणारा हा अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर आहे.
संकेत कोर्लेकरने नुकंतच iPhone 16 Pro खरेदी केला आहे. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. पण, संकेतने हा फोन त्याच्या नवीन युट्यूब चॅनेलसाठी घेतला आहे. "नवीन चॅनेल सुरू होत आहेत म्हंटल्यावर नवीन खरेदी हवीच..😎 iphone 16 pro max 512 GB in the house", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. संकेतच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
संकेतचं Korlekarmania हे युट्यूब चॅनेल आहे. त्याचे युट्यूबवर जवळपास पाच लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याला युट्यूबचं सिल्व्हर बटणही मिळालं आहे. संकेतचे त्याच्या बहिणीबरोबरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.