आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..."
By कोमल खांबे | Updated: February 11, 2025 09:20 IST2025-02-11T09:19:55+5:302025-02-11T09:20:54+5:30
Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..."
Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. या प्रकरणी समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता संकेत कोर्लेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन रणवीरचा शोमधील व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे.
संकेत कोर्लेकर काय म्हणाला?
"एवढं नॉर्मलाइज करायचं सगळं? आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? एकीकडे हे पॉडकास्टमध्ये जगभराची अक्कल पाजळत बसतात आणि अश्या शोजमध्ये जाऊन स्वत:ची खरी ओळख जगासमोर आणतात. हा रणवीर किंवा तो समय कितीही मोठ्या लेव्हला पोहोचले असतील किंवा कुणीही तुमचा आवडता अभिनेता असो किंवा कुणीही असो...डोळे झाकून त्यांच्या स्क्रीन प्रेजेन्सवर विश्वास ठेवू नका. अर्ध्यापेक्षा जास्त एकाच माळेचे मणी असतात. रील्सवरती त्याचा स्वॅग बघून त्याला आयडोल करणं सोडा..."
"ही सगळी ओव्हररेटेड मंडळी त्याच लोकांना आवडू शकतात ज्यांना स्वत:ची अक्कल वापरता येत नाही आणि कायम जग जसं चाललंय तसं मागे मागे धावत सुटतात. अशा लोकांना हिरो करून ठेवणाऱ्या तुमच्या आयुष्यातल्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर करा नाहीतर कधीतरी अनावधानाने ह्या लोकांना बघत बघत तुम्ही सुद्धा असेच बनाल...तुम्हाला माझं म्हणणं पटलं नसेल कर अनफॉलो करू शकता...माझं कुटुंब मला कायम क्लीन लागलं...मग मित्र असो वा मैत्रीण".
'इंडियाज गॉट लेटेंट'मधील पालकांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियाने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांची माफी मागितली आहे. पण, हेदेखील नाटक असल्याचं संकेतने म्हटलं आहे.
"आता हे माफी मागणार आणि काही दिवसांनी मस्त काहीतरी पीआर करून गोड गोड वागून पुन्हा लोकांच्या हृदयात शिरणार आणि आपले गुणी फॉलोवर्, पुन्हा त्याच लूपमध्ये फिरत राहणार. हेच तर चालत आलंय...आज ह्याने असं वक्तव्य केलं नसतं तर मी तरी कुठे साहेबांना स्टोरीवर आणले असते. मला फक्त माझ्या गुणी फॉलोवर्सला एवढंच सांगणं आहे की कधीच कुणासाठीच आपल्या आईवडिलांवर जोक करू नका किंवा ते सहनही करू नका. जो ह्याला फॉलो करत असेल त्यालाच पहिले अनफॉलो करा...किमान तुमचे इन्स्टाग्राम स्वच्छ राहील"