"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:17 IST2025-06-23T15:13:10+5:302025-06-23T15:17:13+5:30

"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या  नाट्यगृहाची दूरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणाला...

marathi actor sankarshan karahade post expressing displeasure after seeing the dilapidated condition of the theatre in parbhani | "इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्यक्त केली नाराजी

"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्यक्त केली नाराजी

Sankarshan Karhade Post : वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) .  त्याने अनेक कलाकृतींद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम अभिनेता आहेच. त्यासोबतच तो एक उत्तम कवी, लेखक आणि सूत्रसंचालक आहे. सध्या रंगभूमीवर संकर्षण कऱ्हाडेच्या  कुटूंब किर्रतन या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. या नाटकाचा सध्या मराठवाडा दौरा सुरु आहे. याचनिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 


दरम्यान, कुटुंब कीर्रतन नाटकाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक लक्षवेधी पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने सध्याच्या नाट्यगृहांमधील त्रुटींबाबत आणि दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "परभणीत फक्तं पाय ठेवता आले … आजपासून कुटूंब किर्रतन नाटकाचा मराठवाडा दौरा आहे. आज २३ जून नांदेड , उद्या २४ जून लातूर , २५ जून छ. संभाजीनगर असे प्रयोग आहेत … दूर्दैवाने ह्या यादीत “माझं गाव… परभणी नाही…". 

त्यानंतर संकर्षण कऱ्हाडेने लिहिलंय, "ह्याचं कारण , परभणीतल्या रंगमंदिराची दूरावस्था… ईतकं वाईट वाटलं… कि ज्या परभणीत कलाकृतींची , कलाकारांची परंपरा… तिथे तिथल्याच कलाकाराच्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होउ शकत नाही. असो … आपलं गांव ते आपलं गांव… प्रेम तितकंच आहे… कधीतरी इथेही प्रयोग होईल अशी आशा … माझ्या माणसांनो… प्रेक्षकांनो … नाटकाला या …", अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: marathi actor sankarshan karahade post expressing displeasure after seeing the dilapidated condition of the theatre in parbhani