चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:28 IST2025-06-04T09:26:08+5:302025-06-04T09:28:39+5:30

मीरा वेलणकर यांच्या पाठोपाठ 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! प्रेक्षक नाराज

marathi actor sameer patil exit from shiva serial shared post on social media | चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..."

चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..."

Shiva Serial: टेलिव्हिजनवरील दैनंदिन मालिका या जणू प्रेक्षकांच्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत.  या मालिका आणि प्रेक्षकांमध्ये अतुट नातं असतं. या मालिकांचे कथानक, त्यामध्ये येणारे रंजक वळण यांमुळे प्रेक्षक आणखी खिळून राहतात. परंतु, या टीव्ही मालिकांमध्ये अचानक काही बदल झाला तर प्रेक्षक नाराज देखील होतात. दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अलिकडेच शिवा मालिकेतून अभिनेत्री मीरा वेलकरण यांनी एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. त्यात आणखी एक निराशाजनक अपडेट मिळते आहे. 


अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी शिवा मालिकेला रामराम ठोकल्यानंतर आता रामभाऊ म्हणजेच अभिनेते समीर पाटील यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सिताई आणि रामभाऊ हे दोन्ही पात्र अचानक मालिकेतून एक्झिट घेत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समीर पाटील यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ... सर्व मित्र-मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद आणि दुःख एकत्र होतंय कारण आता यापुढे शिवा मालिकेत मी रामभाऊ म्हणूण नसणार आहे. या पात्राला तुम्ही खूप प्रेम दिलंत आणि वेळोवेळी तुम्ही ते सांगितलंत, याबद्दल मनापासून आभार... रामभाऊ या व्यक्तिरेखेला झी मराठीचा पुरस्कार पण मिळाला या सगळ्याचं समाधान खूप आहे."

त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय,"या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही मानापासून आभार. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने...", आशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेते समीर पाटील यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, 'शिवा' मालिकेत समीर पाटीट आशुच्या वडिलांची भूमिका साकारत होते. पण आता त्यांच्या एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ही मालिका निरोप घेणार का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे मालिकेत या मीरा वेलणकर आणि समीर पाटील यांच्या भूमिकेत नवीन कलाकार दिसणार की आणखी काही घडणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. 

Web Title: marathi actor sameer patil exit from shiva serial shared post on social media