रोहिणी हट्टंगडी यांच्यानंतर 'ठरलं तर मग' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार सुभेदारांच्या जावयाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:40 IST2025-11-05T11:31:26+5:302025-11-05T11:40:04+5:30
'ठरलं तर मग' मध्ये नव्या कलाकाराची एन्ट्री, कारस्थानी साक्षी सुभेदारांच्या जावयावर लट्टू, कोण आहे तो?

रोहिणी हट्टंगडी यांच्यानंतर 'ठरलं तर मग' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार सुभेदारांच्या जावयाची भूमिका
Tharla Tar Mag: छोट्या लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेली मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. हटके कथानक, कलाकरांची तगडी फळी आणि त्यांचा एकूणच अभिनय यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानवर असते.सध्या मालिकेत सायलीचे आई-बाबा जिवंत असल्याचा ट्रक दाखवण्यात आला आहे. मात्र,सायली दुसऱ्या कोणाची नव्हे तर किल्लेदारांची मुलगी आहे, हे सत्य अद्याप समोर आलेलं नाही. त्यात सुभेदारांची लेक अस्मिता गरोदर आहे आणि ती तिच्या नवऱ्याची वाटेला डोळे लावून वाट बघत आहे.अखेर परदेशात असलेला सुभेदारांचा जावई मायदेशी परतला आहे.
'ठरलं तर मग' मध्ये अस्मिताचा नवरा सचिनच्या भूमिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी लागली आहे. नुकत्याच काल प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या भागात त्याची झलक सुद्धा दाखवण्यात आली आहे. एकदंरीत सुभेदारांचा हा जावई लबाड आणि स्त्रीलंपट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पत्नीला भेटायचं सोडून सचिन मुंबईत आल्यानंतर थेट साक्षी शिखरेच्या घरी पोहोचला आहे.

दरम्यान, 'ठरलं तर मग' च्या यापूर्वीच्या भागात चेहरा न दाखवता एक व्यक्ती साक्षीशी फोनवर चॅट करताना दाखवला होता, शिवाय तो कॉलवरही बोलत होता. त्याचवेळी अस्मिता तिच्या नवऱ्याशीही संभाषण करत होती. मात्र, ती व्यक्ती नेमकी कोण होती, याबद्दल अस्पष्टता होती.आता त्यावरून पडदा हटवण्यात आला आहे.हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून नकुल घाणेकर आहे.
कोण आहे सुभेदारांचा जावई?
यापुढे 'ठरलं तर मग' मालिकेत सुभेदारांच्या जावयाच्या भूमिकेत अभिनेता नकुल घाणेकर दिसणार आहे. नुकलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने आजवर अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अजूनही चांदरात आहे', 'गाथा नवनाथांची' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे.