घरात आली नवीन गाडी! 'मुरांबा' फेम अभिनेत्याने शेअर केली आनंदाची बातमी, सेलिब्रिटींकडून होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:34 IST2026-01-09T09:31:50+5:302026-01-09T09:34:07+5:30
'मुरांबा' फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती, घेतली नवीकोरी गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

घरात आली नवीन गाडी! 'मुरांबा' फेम अभिनेत्याने शेअर केली आनंदाची बातमी, सेलिब्रिटींकडून होतंय कौतुक
Abhijeet Chavan Buy New Car: आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक कलाकार त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले तर काहींच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं. आता या पाठोपाठ मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिजीत चव्हाण. नव्या वर्षात अभिनेत्याने त्याची आवडती गाडी खरेदी करत स्वप्न पूर्ण केलं आहे.
अभिजीत चव्हाण सध्या‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘मुरांबा’ मालिकेतही काम करताना दिसतो आहे.
अभिजीत चव्हाण सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याने नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याची आनंदाची बातमी नुकतीच सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्याचे कुटुंबीय नव्या गाडीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. "मागचं वर्ष फारसं चांगलं गेलं नाही, त्यामुळे मला आता स्वतःसाठी नवीन घर आणि नवीन गाडी घेऊन स्वत:चे लाड पुरवून घ्यायचे आहेत... गणपती बाप्पा मोरया...", असं मजेशीर कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे. नव्या गाडीच्या स्वागतासाठी संपूर्ण चव्हाण कुटुंब एकत्र गेलं होतं.
अभिजीतने खरेदी केलेल्या गाडीचं नाव 'mahindraxev9e' असं आहे. अभिनेत्याची नवीन गाडी पाहून त्याच्या कुटुंबीयांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे. या गाडीची किंमत २१.९० लाख ते ३१.२५ लाख रुपये इतकी आहे.
दरम्यान, मराठी कलाविश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. कुशल बद्रिके,सचिन देशपांडे, सिद्धार्थ खिरिड या कलाकारांनी अभिजी चव्हाणच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.