'अश्विनी ये ना..' म्हणत थिरकली अनिरुद्धची पावलं; डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:45 IST2022-03-24T18:44:31+5:302022-03-24T18:45:25+5:30
Milind gawali: अनेकदा मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांची वैयक्तिक मत मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांनी चक्क डान्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का दिला आहे.

'अश्विनी ये ना..' म्हणत थिरकली अनिरुद्धची पावलं; डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. या मालिकेत मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे नकारात्मक भूमिका साकारुनही त्यांनी विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाल्याचं दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
गेल्या काही काळात मिलिंद गवळी यांचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ते अनेकदा मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांची वैयक्तिक मत मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांनी चक्क डान्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का दिला आहे.
मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची तयारी करताना दिसत आहेत. या सोहळ्यामध्ये ते एक डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत. यावेळी ते अश्विनी ये ना या गाजलेल्या गाण्यावर डान्स करणार आहेत. त्यामुळे या गाण्यावरील डान्सची ते प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनिरुद्धसह अरुंधती आणि अनघा ही जोडीदेखील डान्स करणार आहे. त्यामुळे सासू-सुनेचा डान्स लोकप्रिय ठरतो. की, एकट्या अनिरुद्धचा हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.