'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:26 IST2023-06-29T17:26:17+5:302023-06-29T17:26:51+5:30
Kushal badrike: कुशल अभिनेता असण्यासोबतच त्याला लिखाणाचीही आवड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो कायम लिहित असतो.

'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट
सध्या संपूर्ण देशात विठ्ठलमय वातावरण झालं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात वारकऱ्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन गेला आहे. यामध्येच अभिनेता कुशल बद्रिके (kushal badrike) याने एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.
"अख्खी वारी करून ‘वारकरी’ नुसतं कळसाच्या पाया पडून परततात आणि मग लोक “विठ्ठल” म्हणून त्या वारकऱ्याच्याच पाया पडतात. ज्या वारकऱ्याने वारीत “प्रत्यक्ष” विठ्ठलाचं दर्शनच घेतलं नाही, तो स्वतःच “विठ्ठल” होऊन परततो.आणि इकडे रखुमाईच्या जन्माला येऊनही “विठ्ठल” नशिबात नसतो. दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं. नाही का ? असो… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. ( सुकून.), अशी पोस्ट कुशलने शेअर केली आहे.
दरम्यान, मराठी कलाविश्वातील गुणी आणि कष्टाळू अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिलं जातं. चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कुशल घराघरात पोहोचला. विनोदशैलीसह उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. कुशल अभिनेता असण्यासोबतच त्याला लिखाणाचीही आवड आहे. तो कायम सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असतो.