"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:20 IST2024-09-16T15:19:06+5:302024-09-16T15:20:39+5:30

सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे. 

marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video | "अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

किरण माने हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे ते चर्चेत आले होते. 'मुलगी झाली हो' या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'पिंपळपान', 'भेटी लागी जीवा', 'सिंधुताई माझी माई' या मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. सध्या ते 'तिकळी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

बिग बॉस मराठीमुळे किरण मानेंच्या चाहत्या वर्गात भर पडली. ते सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. समाजातील अनेक घडामोडींवर ते अगदी परखडपणे त्यांची मतं मांडताना दिसतात. किरण मानेंच्या राजकारणाबाबत केलेल्या पोस्टही अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. पण, आता मात्र मानेंनी चक्क ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे. 


किरण मानेंबरोबर तिकळी मालिकेतील कलाकारही या रीलमध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे. अभिनेत्री तृप्ती गायकवाड आणि अभिनेत्री मिलन डिसुजा यांनी किरण मानेंबरोबर हा रील बनवला आहे. या रीलमध्ये किरण मानेंचा भलताच अंदाज पाहायला मिळत आहे. मानेंचा हा रील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

सध्या किरण माने सन मराठी वाहिनीवरील 'तिकळी' या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत पूजा ठोंबरे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ घाडगे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video