मराठी अभिनेत्याची एक्स वाईफ 'बिग बॉस' मध्ये, म्हणाले, 'छोले पुरीचा स्टॉल टाकेन पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 10:58 IST2023-11-01T10:56:57+5:302023-11-01T10:58:11+5:30

नुकतंच त्यांनी त्यांच्या बिग बॉस एन्ट्रीवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

marathi actor kiran karmarkar s ex wife rinku dhawan in bigg boss says he will never enter in house | मराठी अभिनेत्याची एक्स वाईफ 'बिग बॉस' मध्ये, म्हणाले, 'छोले पुरीचा स्टॉल टाकेन पण...'

मराठी अभिनेत्याची एक्स वाईफ 'बिग बॉस' मध्ये, म्हणाले, 'छोले पुरीचा स्टॉल टाकेन पण...'

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या टीव्हीवर गाजत आहे. अंकिता-विकी, नील-ऐश्वर्या या नवरा बायकोच्या जोड्या लक्ष वेधून घेत आहेत. तर मुन्नावर फारुकीही त्याचा जबरदस्त खेळ दाखवत आहे. दरम्यान ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार हे एक्स कपलही घरात असून त्यांनाही फुटेज मिळतंय. दरम्यान आणखी एक स्पर्धक रिंकू धवनचा एक्स हसबंडही घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तिचे पूर्वाश्रमीचे पती किरण करमरकर हे मराठी अभिनेते आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या बिग बॉस एन्ट्रीवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना किरण करमरकर म्हणाले,'या सगळ्या अफवा आहेत. मला बिग बॉसची ऑफर आलेली नाही आणि मी कधीही शोमध्ये येणारही नाही. मी आजपर्यंत शो पाहिलेला नाही. मी वादविवाद नक्कीच ऐकले आहेत. पण मी कधीच एका जागी बसून शो पाहिलेला नाही. जेव्हा रिंकूने शोमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने आधी मला कॉल केला. आम्ही एकाच सोसायटीत राहतो. कारण आमच्या मुलाला दोन्ही ठिकाणी राहता येईल. ती काही दिवस नसेल असं तिने मला सांगितलं मी तिला शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा त्याच्या जगात व्यस्त आहे त्यामुळे त्यालाही बिग बॉसबद्दल काही माहित नाही.'

ते पुढे म्हणाले,'बिग बॉसच्या घरात बंद राहणं आणि लोकांसोबत भांडत राहणं याशिवायही  पैसे कमावण्याचे इतर पर्याय आहेत. मला कळतच नाही जेव्हा कलाकार म्हणतात की त्यांनी अनेक सिझन्स पाहिले आहेत. मला नाही माहित ते कोणत्या गेमबद्दल बोलत असतात. मी साधा सरळ आहे आणि मला फक्त अभिनय करता येतो, लोकांचं मनोरंजन करता येतं. उद्या गरज पडली तर मी छोले भटुराचा स्टॉल लावून पैसे कमवेल पण तुम्ही म्हणाल की बिग बॉसच्या घरात जाऊन मी लोकांवर ओरडू तर ते मला जमणार नाही.'

रिंकू धवन आणि किरण करमरकर एकता कपूरच्या एका मालिकेत काम करताना प्रेमात पडले. त्या मालिकेत दोघं बहीण भावाच्या भूमिकेत होते. नंतर ते लग्नबंधनातही अडकले. मात्र काही वादविवादामुळे लग्नाच्या १५ वर्षांनी २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 

 

Web Title: marathi actor kiran karmarkar s ex wife rinku dhawan in bigg boss says he will never enter in house