फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'देवमाणूस'मध्ये गाजवलीये भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:00 IST2023-11-01T18:00:00+5:302023-11-01T18:00:00+5:30
Marathi actor: या अभिनेत्याने 'लागिरं झालं जी' या मालिकेतही काम केलं आहे.

फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'देवमाणूस'मध्ये गाजवलीये भूमिका
सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे आज प्रत्येक सेलिब्रिटी या माध्यमातून थेट चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यात काय घडतंय याचे लहानसहान अपडेटही ते चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. यात सध्या सोशल मीडियावर देवमाणूस या मालिकेतील एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्याने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. 'देवमाणूस', 'लागिरं झालं जी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं असून काही मराठी सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
व्हायरल होत असलेला हा फोटो अभिनेत्याच्या कॉलेज जीवनातील आहे. त्यावेळी तो २० वर्षांचा होता. या फोटोमध्ये त्याने पांढरा सदरा परिधान केला असून त्यावर मस्तपैकी भगवा फेटा बांधला आहे. परंतु, त्याचा लूक पाहून तो नेमका कोणता अभिनेता आहे हे अनेक जण ओळखू शकलेले नाहीत.
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून किरण गायकवाड आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या किरणने 'देवमाणूस' होत तुफान लोकप्रियता मिळवली. इतंकच नाही तर तो 'चौक' या मराठी सिनेमातही झळकला आहे.