मराठी अभिनेत्याला वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज, थेट लंडनवरुन भेटायला आला भाऊ, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:11 IST2025-12-22T11:09:09+5:302025-12-22T11:11:16+5:30
वाढदिवसाला सरप्राइज मिळालं तर कोणाला नाही आवडत. पण, मराठी अभिनेत्याला त्याच्या वाढदिवशी असं सरप्राइज मिळालं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केलेला नव्हता.

मराठी अभिनेत्याला वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज, थेट लंडनवरुन भेटायला आला भाऊ, पाहा व्हिडीओ
वाढदिवसाला सरप्राइज मिळालं तर कोणाला नाही आवडत. पण, मराठी अभिनेत्याला त्याच्या वाढदिवशी असं सरप्राइज मिळालं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केलेला नव्हता. अनेक मालिकांमध्ये काम करुन घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष संजीवचा नुकताच वाढदिवस झाला. यंदाचा वाढदिवस आयुषसाठी खऱ्या अर्थाने खास ठरला. त्याला वाढदिवसाला कुटुंबाकडून खास सरप्राइज मिळालं. याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
आयुषला सरप्राइज द्यायला त्याचा भाऊ लंडनवरुन कर्जतला आला होता. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतंय की आयुष आणि कुटुंबीय डोळे बंद करून उभे आहेत. नंतर गाडीतून एक व्यक्ती उतरते. ही व्यक्ती म्हणजे आयुषला लंडनहून सरप्राइज द्यायला आलेला त्याचा छोटा भाऊ आहे. भावाला बघून आयुष आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हातात बर्थडे केक घेऊन आयुषच्या छोट्या भावाने त्याला खास बर्थडे सरप्राइज दिलं.
हा व्हिडीओ शेअर करत आयुषने कॅप्शनमध्ये म्हटलंय की "उत्तू घरी आला रे...लंडन ते कर्जत. माझ्या आईने २४ वर्षांपूर्वी मला हे खास गिफ्ट दिलं. आणि आता बाबांनी माझ्या भावाला घरी आणत आणखी एक गिफ्ट मला दिलं". आयुषच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयुषने 'बॉस माझी लाडाची', '३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.