Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांच्या बाप्पाचं अनोख्या पद्धतीने झालं विसर्जन, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 16:19 IST2022-09-07T16:16:59+5:302022-09-07T16:19:30+5:30
Aadesh Bandekar Ganpati Visarjan : होय, आदेश बांदेकर यांच्या घरच्या सात दिवसांच्या बाप्पाचं नुकतंच विसर्जन झालं. ते सुद्धा अगदी अनोख्या पद्धतीने.

Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांच्या बाप्पाचं अनोख्या पद्धतीने झालं विसर्जन, पाहा व्हिडीओ
Aadesh Bandekar Ganpati Visarjan : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे नाव आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. याच आदेश बांदेकरांकडे थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली. होय, आदेश बांदेकर यांच्या घरच्या सात दिवसांच्या बाप्पाचं नुकतंच विसर्जन झालं. ते सुद्धा अगदी अनोख्या पद्धतीने.
सर्वांचे लाडक भाऊजी आदेश बांदेकर यांच्याकडे सात दिवसांचे बाप्पा विराजमान झाले होते. बाप्पाच्या घरचा बाप्पा दरवर्षीच खास असतो. त्यांच्या घरच्या बाप्पाला 100 हून जास्त वर्षांची परंपरा आहे. पिढ्यान् पिढ्या बांदेकरांच्या घरात बाप्पाचं पूजन होतंय.
आधी बांदेकरांच्या सिंधुदुर्गमधील गावातल्या घरात बाप्पा विराजमान व्हायचा. आता तो बांदेकरांच्या मुंबईतील घरी विराजमान होतो. या गणपतीचा नैवेद्य सुद्धा वेगळा असतो. बांदेकरांच्या बाप्पाला पुरणाच्या मोदकांचा प्रसाद अर्पण केल्या जातो. यंदाचं बांदेकरांच्या बाप्पाचं विसर्जनही आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालं. याचा एक व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
पुढच्या वर्षी लवकर या, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यात बाप्पाची मूर्ती अॅटोमॅटिकच वर जाताना दिसते आणि नंतर अॅटोमॅटिकच त्याचं विसर्जनही पार पडतं. बाप्पाच्या विसर्जनाला आदेश बांदेकर, त्यांचा लेक सोहम बांदेकर आणि संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर गेल्या कित्येक वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आदेश बांदेकरांच्या पती सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम हे दोघंही कलाविश्वात सक्रीय आहेत.